मन म्हणजे एक अस काही ज्यात सार विश्व सामावलेलं असत ,
ते विश्व मात्र कुणालाच कळलेल नसत .
मन म्हणजे एक असा आरसा,
जो स्वतःच प्रतिबिंब स्वतःच पाहत असत .
मन म्हणजे एक अशी जान्हीव ,
जी फक्त स्वतःला होते .
मन म्हणजे एक असा मित्र,
जो नेहमी साथ देतो .
मन म्हणजे एक असा शत्रू ,
जो कधी - कधी आपल्या जवळच्या व्यक्तीला त्रास देतो .
मन म्हणजे एक युद्ध ,
जे स्वतः बरोबरच चालेले असत .
मन म्हणजे मंद वारा ,
जो कधी कधी खूप शांत असत .
मन म्हणजे एक वादळ ,
जे नेहमी एका कोपऱ्यात चालू असत .
मन म्हणजे एक न संपणार प्रवास ,
जो प्रत्येक माणूस जन्मल्या पासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एकटाच करत असतो ..........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा